मुख्य संपादक:- सुनिता महाडिक
दरोडा आणि चोरीचे गुन्हे उघड चाळीसगाव पोलिसांची कारवाई चाळीसगाव तालुक्यातील पटोंदा येथील ६० वर्षीय महिलेस दमदाटी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्ती ने लुटण्याचा गुन्हा अवघ्या १२ तासात उघडीस आणत चाळीसगाव शहर पोलिसांनी ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्दे माल हस्तगत केला या प्रकरणात ५ जनान विरोधात कारवाई करण्यात आली असून विधी संघर्षक बालक मंडळा समोर हजार करण्यात आले आहे दरम्यान खरजई इथे झालेल्या घरफोडी करून १ लाख ६८ हजार चे दागिने चोरी करणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १८ हजारांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. किरणकुमार कबाडी सर याच्या मार्गदर्शनानी त्यांच्या टीम मधील Psi घुले सर,
अजय पाटील, राकेश पाटील, राहुल सोनवणे, योगेश बेलदार विजय पाटील नरेंद्र चौधरी या
सदस्यांनी १२ तासाच्या आत या गुन्हेगारांना पकडले आहे.
या वेळी कविता नेरकर मॅडम यांनी या सर्व प्रकरणाची माहिती दिली व गुन्हेगरांचे नाव समोर आणले ते गुन्हेगार पुढीप्रमाणे
अमोल कडवाबोर्से वय २२ वर्ष
शरद सुधाकर चव्हाण वय २० वर्ष
सुधीर मल्लपा चव्हाण वय २० वर्ष
अभिषेक भोसले
हे गुन्हेगार मंगळूर तांडा, चित्तूर, परभणी ईथील असल्याचे देखील सांगण्यात आले या गुन्हेगारांकडून रोख ७८,६०० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला
Post a Comment
0 Comments