मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
India Pakistan War: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता आहे. भारतीय वायूदलाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश
India vs Pakistan War: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी भारत आणि पाकिस्तान (Pakistan Army) दोन्ही बाजुंकडून सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर इंटेलिजन्स सर्व्हिस अर्थात ISI सक्रिय झाली आहे. आयएसआयच्या अधिकाऱ्यांकडून भारतीय सैन्याची (Indian Army) सीमेवरील हालचाल आणि नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आयएसआयकडून पंजाबमधील टोलनाके आणि विद्यार्थ्यांना फोन केले जात आहेत.
आयएसआयकडून पंजाबच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या लष्करी छावण्यांमधील सैन्य अधिकाऱ्यांच्या मुलांना फोन केले जात आहेत. यापैकी एका मुलासोबतचा आयएसआय अधिकाऱ्याच्या फोन कॉलची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. संबंधित मुलाचे वडील भारतीय सैन्यात आहेत. ते भटिंडा येथील एका लष्करी क्वार्टर्समध्ये राहत होते. ही गोष्टी आयएसआयच्या अधिकाऱ्यांना माहिती होती. त्यामुळे आयएसआयच्या अधिकाऱ्याने आपण अकाऊंटंट असून कॉलेजमधील सिक्युरिटी डिपॉझिट परत करण्याच्या बहाण्याने या मुलाशी बोलायला सुरुवात केली. "तुझे सिक्युरिटी डिपॉझिटचे पैसे परत येतील. तुझ्यासोबत क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या इतर मुलांचा फोन लागत नाही. ती मुलं कुठे आहेत, त्यांचे वडील आणि सैन्याच्या क्वार्टसमधील अधिकारी तिथेच आहेत का सीमारेषेच्या भागात ड्युटीसाठी गेले आहेत", असे अनेक प्रश्न आयएसआयच्या अधिकाऱ्याने विचारले. त्यावर संबंधित मुलाने मला काही माहिती नाही. मी आता लष्कराच्या कँपमध्ये राहत नाही. माझे वडील निवृत्त होणार असल्याने आम्ही दुसरीकडे राहायला गेलो आहोत, असे सांगितले. तरीही ISI गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी खोदून खोदून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्याने मुलाला काही मुलींची नावे सांगून पाहिली. मात्र, लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा सावध असल्यामुळे त्याने मला सैन्याच्या कँपमधील कोणतीही माहिती नाही, असे सांगितले.
पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकडून आणखी कोणाला फोन
भारतीय सैन्याला आयएसआय लष्कराची हालचाल जाणून घेण्यासाठी असा काही प्रकार करेल, याचा अंदाज होता. त्यादृष्टीने स्थानिक नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यापूर्वीही आयएसआयने भारतीय सैन्याच्या माहिती मिळवण्यासाठी अशाप्रकारचे उद्योग केले आहेत. जेणेकरुन भारतीय सैन्य नेमके कुठल्या भागात आहेत, याची माहिती पाकिस्तानी लष्कराला सतर्क करता येईल, हा IAS चा प्रयत्न आहे. त्यासाठी जालंधर, होशियारपूर, मुकेरिया या भागातील नागरिकांना ISI कडून अशाप्रकारचे फोन येत असल्याची माहिती आहे.

Post a Comment
0 Comments