मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
Ambarnath News : अंबरनाथ पश्चिमेच्या मिरची वाडी
परिसरातील पटेल प्रेस्टिज इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यामध्ये जुगाराचा अड्डा सुरू होता पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकला
अंबरनाथ : पोलिसांकडून कारवाई होत असताना देखील
जुगार अड्डा चालविला जात असतो. अशाच प्रकारे अंबरनाथमध्ये एका इमारतीच्या गाळ्यात सुरू असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी छापा टाकत उध्वस्त केला आहे. पोलिसांनी या कारवाईत सदर ठिकाणाहून ११ पुरुष आणि २ महिलांसह एकूण १३ जणांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव मिरची वाडी परिसरातील पटेल प्रेस्टिज इमारतीच्या तळमजल्यावरील एका गाळ्यामध्ये जुगाराचा अड्डा सुरू होता. याबाबतची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी तिथे जुगार खेळताना ११ पुरुष आढळून आले. या सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अकरा जण ताब्यात
धक्कादायक बाब म्हणजे २ महिलांकडून जुगाराचा अड्डा चालवला जात होता. तसेच तिथे पकडलेल्या ११ पुरुषांपैकी ८ पुरुष हे कल्याण आणि डोंबिवली परिसरातून अड्डयावर जुगार खेळण्यासाठी आले असल्याचं यावेळी स्पष्ट झालं. या छापा कारवाईत पोलिसांनी ३१ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला असून सर्व आरोपींच्या विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे यांनी दिली आहे.
मनमाडमध्ये गांजा विक्री करणारे अटकेत
नाशिकच्या मनमाड शहरातील विविध भागात गांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने मनमाड पोलिसांनी तीन वेगवेगळे पथक तयार केले. यानंतर गुप्त माहितीच्या आधारे एकाच वेळी छापे मारत गांजा विक्री करणाऱ्या महिलेसह दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त केला. त्यांना गांजा कोण पुरवतो, यामागे आणखी कोण आहे याचा तपास पोलीस करत आहे.

Post a Comment
0 Comments