मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिराती साठी संपर्क करा:- 9273165283
जळगाव – दृढ निर्णयशक्ती, प्रभावी नेतृत्व आणि विकासदृष्टिकोन यामुळे ओळखले जाणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, बुधवार ६ ऑगस्ट रोजी, जळगाव दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३.०० वाजता ते हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रस्थान करतील आणि ३.२५ वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे.
त्यानंतर केवळ पाच मिनिटांच्या थांब्यानंतर, ३.३० वाजता ते विमानाने पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहेत. हा दौरा अल्पावधीचा असला तरी, फडणवीस यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याचे मन:पूर्वक स्वागत करणार आहेत.
राज्यातील राजकारणात स्पष्ट विचार, विकासाभिमुख निर्णय आणि प्रशासनावरची पकड या त्रिसूत्रीवर काम करणारे फडणवीस, आपल्या अचूक वेळापत्रक आणि कार्यक्षमतेमुळे सतत चर्चेत असतात. जळगावमधील त्यांच्या या क्षणिक थांब्यालाही कार्यकर्ते ‘सन्मानाची संधी’ मानून सज्ज झाले आहेत.

Post a Comment
0 Comments