मुख्य संपादक: - सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव
चाळीसगाव शहरात झालेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा तपास शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत उघडकीस आणत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
घटना कशी घडली?
दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी लता रविंद्र जाधव (वय 40, रा. शाहबीनगर) या आपल्या आईला भेटण्यासाठी चाळीसगाव बसस्थानकावर आल्या होत्या. भेट झाल्यानंतर त्यांनी आईला पाचाऱ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवले. बस सुटल्यावर त्यांना लक्षात आले की त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीस गेले आहे. मंगळसूत्राची किंमत अंदाजे ₹24,000 एवढी होती.
त्यानंतर त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासाची दिशा आणि संशयितांचा शोध
तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तपासाची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपवण्यात आली. तपास पथकाने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून शोध सुरू केला. तपासादरम्यान घाट रोडवरील कमलशांती पॅलेसजवळ एक महिला आणि दोन मुली संशयास्पद हालचाल करताना आढळून आल्या.
त्यांची चौकशी केली असता मुलींनी सांगितले की चोरी त्यांनी नाही तर आजीने केली आहे. त्यानंतर पंचांसमक्ष ई-साक्ष अॅपद्वारे त्यांची झडती घेतली असता सोन्याचे डोरले, मणी, एक चाकू, छोटे ब्लेड आणि सोन्याचा मणी असा ऐवज मिळून आला. अखेर चौकशीत महिलेनेच मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.
कारवाई करणारे पोलिस कर्मचारी
या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, संदीप मोरे, पवन पाटील आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजली पवार यांचा मोलाचा सहभाग होता.
अमितकुमार मनेळ यांचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण
या संपूर्ण तपास मोहिमेत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी सतत पथकाला मार्गदर्शन करत वेगवान आणि नियोजनबद्ध तपास घडवून आणला. त्यांच्या तत्पर निर्णयक्षमतेमुळे आणि नेतृत्वामुळे अवघ्या पाच तासांत गुन्ह्याचा छडा लागला. मनेळ यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचं शहरात विशेष कौतुक होत आहे.
अभूतपूर्व कामगिरी
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत तपास पूर्ण करून आरोपींना गाठणे ही पोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरी आहे. नागरिकांनी या जलद व परिणामकारक कारवाईचे स्वागत केले असून शहरात या घटनेची जोरदार चर्चा आहे.

Post a Comment
0 Comments