Type Here to Get Search Results !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर


चाळीसगाव : सेवा पंधरवाडा 2025 निमित्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता नगरपालिका मंगल कार्यालय (शादीखाना), चाळीसगाव येथे होणार आहे.


या शिबिरात महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी, लहान मुलांसाठी बालरोग तपासणी तसेच नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची व मोतीबिंदू तपासणी केली जाणार आहे. याशिवाय महालॅब तर्फे विविध रक्त तपासण्या होतील. नागरिकांना सर्वप्रकारच्या शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन व प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत.


शिबिरात गर्भवती मातांची तपासणी, लहान मुलांची वाढ व आरोग्य तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, दमा, थायरॉईड, पोटाचे विकार, कान-नाक-घसा, दातांचे विकार, त्वचारोग तसेच डोळ्यांचे विकार यांसह ECG तपासणीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मोफत सल्ला, तपासणी आणि आवश्यक औषधोपचार केले जाणार आहेत.


सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा घराजवळ मिळावी, गरजू लोकांनी योग्य वेळेत आजाराचे निदान करून उपचार घ्यावेत हा या शिबिरामागचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


हा उपक्रम भारतीय जनता पार्टी, चाळीसगाव शहर मंडळ व चाळीसगाव भाजपा मंडळाध्यक्ष श्री नितीन भाऊ पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, विशेषतः युवराज संभाप्पा जाधव (जिल्हाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, जळगाव पश्चिम) व प्रभाकरभाऊ चौधरी (सदस्य, संजय गांधी निराधार योजना) यांच्या पुढाकारातून हा आरोग्य उपक्रम राबविण्यात आला आहे.


स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्या सहकार्यामुळे या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments