मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
खडकी बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
खडकी बुद्रुक :
लोकनेते स्व. पप्पूदादा युवा फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच अल्पदरात चष्मे वाटपाचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये तब्बल ३०९ नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी करून घेतली तर १७८ नागरिकांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
हे शिबिर सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले. गरीब, गरजू व वयोवृद्ध रुग्णांना नवी दृष्टी मिळवून देण्याचे कार्य या शिबिरातून घडले. ग्रामीण भागातील नागरिकांना अशा मोफत व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे अत्यंत स्तुत्य आहे.
लोकनेते स्व. पप्पूदादा युवा फाउंडेशन हे नाव आज सेवाभावी कार्यासाठी ओळखले जाते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्याचे ध्येय फाउंडेशनने घेतले असून हे शिबिर त्या ध्येयाची प्रचिती देणारे ठरले.
शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.







Post a Comment
0 Comments