मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल अंतर्गत शिक्षक भरतीला सुरुवात
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) तसेच माध्यमिक शिक्षक पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक तसेच मे. महाराष्ट्र विकास ग्रुप, नाशिक या संस्थांमार्फत उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम): D.Ed व TET-2/CTET (मराठी माध्यम) तसेच TAIT गुण आवश्यक.
माध्यमिक शिक्षक: B.A./B.Sc. (विशेष विषय — इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) व B.Ed तसेच TAIT गुण आवश्यक.
अर्ज करण्याची तारीख:
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत
👉 https://sesmitd.com/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
भरतीसाठी शाळांची यादी:
या भरतीद्वारे खालील आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक होणार आहे —
वैजापूर, देवाझिरी, विष्णापुर, कृष्णापुर (ता. चोपडा), वाघझिरा, मालोद, डोंगरकठोरा (ता. यावल), लालमाती (ता. रावेर), जोंधनखोदा (ता. मुक्ताईनगर), वलठाण (ता. चाळीसगाव), पिंगळवाडा, दहीवद (ता. अमळनेर), चांदसर (ता. धरणगाव), सोनबर्डी (ता. एरंडोल) आणि सार्वे (ता. पाचोरा).
एकूण प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) — २४ पदे व माध्यमिक शिक्षक — २ पदे अशा २६ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
उमेदवारांनी संस्थेच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून अर्ज करावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment
0 Comments