मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
भुसावळ प्रतिनिधी
नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा मराठी पत्रकार संघ भुसावळ तालुका तर्फे निषेध करण्यात आला आहे व हल्लेखोरा वर कठोर कारवाई करावी या मागणी चे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांना दिले आहे .
निवेदनात म्हटले आहे की त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेला हल्ला ही घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. समाजातील चौथा स्तंभ म्हणून पत्रकार हे सत्य जनतेसमोर आणण्याचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. अशा पत्रकारांवर गुंडगिरीने हल्ला करणे हा लोकशाही व्यवस्थेवर आघात असून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला गळा घालण्याचा प्रयत्न आहे.
भुसावळ तालुका मराठी पत्रकार संघ या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत असून, हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी असेही नमूद केले आहे .
निवेदनावर मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संतोष शेलोडे , सचिव मनोहर लोणे , पत्रकार विनोद गोरधे , आकाश ढाके , किशोर सावळे , रवि कोलते . शोएब सय्यद , कलीम पायलट , वसीम शेख , कमलेश चौधरी , संजय काशिव , हबीब चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Post a Comment
0 Comments