मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
परभणी जिल्हा (प्रतिनिधी): सौ योगिता मनोहर मोपकर
गौरक्षक सेना परभणी व कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या वतीने राजमाता गोमाता गोपाष्टमी महोत्सवानिमित्त गोशाळेचे संचालक, गोरक्षक आणि गोसेवकांचा गौरव सोहळा स्टेडियम परिसरात दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.
या प्रसंगी गोसेवेच्या आणि गोसंवर्धनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल विविध गोशाळा संचालकांना ‘गो गौरव सन्मानपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्कारमूर्तींमध्ये कृष्णप्रिय गोशाळा, झाडगावचे अध्यक्ष गोसेवक मारोतराव महाराज खटीगं झाडगावकर, हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळा, ताडबोरगावचे अध्यक्ष गोसेवक विजय खिस्ते पाटील, देवकृपा गोशाळा, मुरंबाचे अध्यक्ष उद्धव महाराज जवंजाळ पाटील, तसेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी गोशाळा, खडकवाडीचे संचालक डॉ. मनोहर मोपकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक शिवलिंग आप्पा खापरे यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून भुतडा साहेब उपस्थित होते.
गौरक्षक सेना परभणीचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र जनसंपर्क संघटनाचे महामंत्री गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. त्यांनी गोमातेची पूजा, गोसेवकांचा सन्मान व गोसंवर्धनाचे महत्त्व यावर भाष्य करत, "प्रत्येक गावात गोमातेच्या पूजनासोबत संवर्धनाचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत," असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोभक्त रुद्राक्ष आवटे पाटील, गौरक्षक सेना, तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी “राजमाता गोमाता की जय, भारत माता की जय, भगवान श्रीकृष्ण की जय, जय श्रीराम, राधे राधे, राम कृष्ण हरी” या जयघोषांनी वातावरण दुमदुमले.
ही माहिती कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संयोजक गौरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकारांना दिली.









Post a Comment
0 Comments