Type Here to Get Search Results !

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



जिल्हा प्रतिनिधी सो योगिता मनोहर मोपकर परभणी

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न 

 रिसोड -- येथील उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयात परिसर स्वच्छता व संत गाडगेबाबा एक कृतीशील समाज सुधारक या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ह्या स्पर्धेत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तसेच इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग दर्शविला सदर स्पर्धेमध्ये प्रीतम महादेव वैरागड या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक, कार्तिक सावके या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर अंजली श्रीकृष्ण पुंड या विद्यार्थिनी ने तृतीय क्रमांक पटकाविला या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन प्रजासत्ताक दिनी गौरविण्यात येणार आहे आज स्पर्धेत जवळजवळ 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता सदर स्पर्धेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अजाबराव वानखेडे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ खेडेकर मॅडम तसेच प्रा. अमर साबळे, प्रा. डॉ मनोज नरवाडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी लोहटे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी अंजली पुंड तसेच प्रीतम वैरागड, कार्तिक सावके इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले यानंतर प्राचार्य विनोद कुलकर्णी व सर्व प्राध्यापकांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments