Type Here to Get Search Results !

जनतेचा ठाम विश्वास — सागर पाटीलच ठरतील विजयाचे शिल्पकार!

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


🚩 निष्ठा, संघर्ष आणि नेतृत्वाचा संगम — सागर पाटील यांची विजयी वाटचाल सुरू!


बहाळ–कळमडू जिल्हा परिषद गटात आज एक नाव प्रचंड विश्वासाने, अभिमानाने आणि आत्मीयतेने घेतले जाते — सागर रमेश पाटील, भावी व ठाम (फिक्स) उमेदवार. गेली अनेक वर्षे त्यांनी राजकारणाला केवळ सत्तेचे साधन न मानता समाजसेवेचे माध्यम म्हणून स्वीकारले आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा, संघर्षातून नेतृत्व घडवणारा आणि प्रत्येक कुटुंबाशी आत्मीय नाते जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.


तालुका शाखाप्रमुख व तालुका संघटक म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. सुरुवातीपासून शिवसेना मध्ये निष्ठेने कार्य करत त्यांनी पक्षांतराचा विचारही केला नाही. पक्ष सत्तेत नसतानाही त्यांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व करून शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज दिला.


युवा सेना तालुकाध्यक्ष म्हणून चाळीसगाव येथे त्यांनी युवकांना संघटित केले. ग्रामीण भागात युवा सेनेचे पदाधिकारी नियुक्त करून संघटन अधिक मजबूत केले. गावोगावी बैठकांद्वारे त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले. त्यामुळे आज बहाळ–कळमडू गटात त्यांचा मजबूत जनसंपर्क आणि व्यापक सामाजिक संपर्क आहे.


जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांचा सुसंवाद व जवळीक आहे. त्यामुळे विकासकामे गतीने मार्गी लावण्याची क्षमता त्यांच्यात आहे. संपूर्ण गटात ते सक्षम, विश्वासू आणि लढवय्या उमेदवार म्हणून ओळखले जातात. भारतीय जनता पक्ष च्या उमेदवारांना कडवी टक्कर देण्याची ताकद त्यांच्यात आहे, अशी जनतेची ठाम धारणा आहे.


त्यांना पाचोरा–भडगावचे लोकप्रिय व दमदार आमदार किशोर पाटील यांची भक्कम साथ आहे. तसेच जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आणि विशेष साथ जो लाभला तो म्हणजे शिवसेना उपजिल्हा प्रमुख पप्पूदादा गुंजाळ यांनी त्यांना सुरुवातीपासून साथ दिली व त्यांच्या कुटुंबातील बहीण सुनिता राजेंद्र महाडिक यांचीही त्यांना ठाम साथ आहे. या सर्वांच्या पाठबळामुळे त्यांची उमेदवारी अधिक बळकट झाली आहे.


सागर रमेश पाटील म्हणजे निष्ठा, संघर्ष, संघटनशक्ती आणि विकासाचा ध्यास यांचा संगम आहे. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रत्येक समस्येला आपली समस्या मानणारे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे नेतृत्व म्हणून ते पुढे आले आहेत.


“जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास — सागर रमेश पाटील यांनाच साथ!”

Post a Comment

0 Comments