Type Here to Get Search Results !

पत्रकारिता व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी नेतृत्व – सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

 





मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 
संपादक:- कु मुकेश राजेंद्र महाडिक 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


पत्रकारिता व सामाजिक कार्यातील आदर्श नेतृत्व – सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

चाळीसगाव | प्रतिनिधी
पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण, निष्ठावान व प्रभावी योगदान देणाऱ्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचा वाढदिवस दि. 02 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण, स्नेहपूर्ण व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. समाजाच्या विविध स्तरांत कार्यरत असलेल्या व्यक्ती, राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या शुभ प्रसंगी जळगाव जिल्हा माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या पत्नी सौ. संपदाताई पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच चाळीसगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक श्रीघृष्णेश्वर दादा पाटील, राहुलदादा मस्के, अभिषेक दादा देशमुख, रोशन दादा जाधव यांच्यासह बहाळ–कळमडू गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य व दमदार नेतृत्व श्री सागर पाटील यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

पत्रकारिता क्षेत्रातून चाळीसगाव तालुक्यातील सर्व सन्माननीय पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मुराद दादा पटेल, विजयदादा गायकवाड, योगेशदादा मोरे, रणधीर जाधव, विजयदादा सपकाळ, गायकवाड दादा तसेच इतर अनेक पत्रकार बांधवांचा समावेश होता. पत्रकारिता क्षेत्रातील सहकाऱ्यांनी सौ. सुनिता ताईंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक जाणिवेचे, निर्भीड लेखनाचे आणि जनहितासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले.

वैद्यकीय क्षेत्रातून देखील मान्यवर उपस्थित होते 
New master hospital चे संचालक श्री शादाब खान सर, गणेश मेडिकल चे संचालक श्री गणेश चौधरी 

सामाजिक क्षेत्रातूनही अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. संजयभाऊ कापसे, विनायक दादा मांडोळे, सागर अगोणे, दिलीप बोराडे दादा सुनील गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते, युवक व महिला प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने सौ. सुनिता ताईंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या निमित्ताने सौ. सुनिता ताईंना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष स्वरूपातही शुभेच्छांचा वर्षाव झाला. पद्मजा ताई देशमुख यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना (शिंदे गट) पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे दमदार आमदार व कार्यसम्राट नेतृत्व किशोर पाटील, शिवसेना शिंदे गट जळगाव जिल्हाप्रमुख श्री रावसाहेब पाटील, कुरंगी–बाबरूड जिल्हा परिषद सदस्य पदम बापू, शिवसेना जिल्हा प्रमुख सौ ललिता ताई पाटील व चाळीसगाव भाजप नगरसेवक युवराजदादा संभाआप्पा जाधव, पत्रकार सूर्यकांत दादा कदम  तसेच भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ. देवयानीताई ठाकरे, व्हॉइस ऑफ मीडिया जळगाव जिल्हाध्यक्ष उज्वलाा ताई बागुल व हिरकणी महिला मंडळ अध्यक्ष सुचित्राताई पाटील जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष आरस्ता मळतकर यांनी फोन व संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण कार्यक्रम आनंदी, आपुलकीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी सौ. सुनिता ताईंच्या सामाजिक बांधिलकीची, पत्रकारितेतील निःपक्षपाती भूमिकेची आणि महिलांसाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. वाढदिवस हा केवळ व्यक्तिगत आनंदाचा क्षण न राहता सामाजिक एकोपा, स्नेह व प्रेरणादायी विचारांचा सोहळा ठरला.

पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सौ. सुनिता राजेंद्र महाडिक या केवळ पत्रकार नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहेत. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. अन्याय, शोषण आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडत त्यांनी पत्रकारितेला सामाजिक भान दिले आहे.

सौ. सुनिता ताईंचे कार्य केवळ बातमीपुरते मर्यादित नसून त्या समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. महिलांचे प्रश्न, त्यांचे हक्क, त्यांचे आत्मसन्मानाचे जीवन यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. सामाजिक कार्य करताना त्यांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे.

पत्रकारिता करताना त्यांनी सत्य, निष्पक्षता आणि समाजहित या मूल्यांना प्राधान्य दिले. कोणत्याही दबावाला न झुकता त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले. त्यामुळेच समाजातील विविध घटकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे. त्यांच्या कार्यात सातत्य, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.

आज त्या अनेक सामाजिक, पत्रकारिता, वैद्यकीय व महिला संघटनांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असूनही त्यांचा जनतेशी असलेला थेट संवाद कायम आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी ऐकून त्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या कार्यातून समाजात प्रेरणा निर्माण होते.

सौ. सुनिता ताई महाडिक यांचे कार्य हे अनेक नवोदित पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एक दिनविशेष नसून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.












Post a Comment

0 Comments