मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
खडकी बुद्रुक येथे लोकनेते स्व. पप्पूदादा युवा फाउंडेशनचे रेशन कार्ड शिबिर; नागरिकांसाठी मोठा दिलासा
खडकी बुद्रुक परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन लोकनेते स्व. पप्पूदादा युवा फाउंडेशनच्या वतीने रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्तीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांना सरकारी कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नयेत, तसेच आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सोपी व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे शिबिर शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रेशन कार्डाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या शिबिरात दुबार रेशन कार्ड काढणे, कुटुंबातील सदस्यांची नावे वाढवणे, नावे कमी करणे तसेच नवीन रेशन कार्डासाठी अर्ज करणे अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नागरिकांनी आपापल्या कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे (कामाच्या स्वरूपानुसार):
१) दुबार रेशन कार्ड (Duplicate Ration Card):
अर्ज, जुने/खराब रेशन कार्ड, रेशन दुकानदाराचा दाखला, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
२) नावे वाढवणे (Add Names):
अर्ज, पत्नीचे नाव असल्यास माहेरचे नाव कमी केल्याचा तहसीलदारांचा दाखला, आधार कार्ड, मूळ रेशन कार्ड
३) नाव कमी करणे (Remove Names):
अर्ज, रेशन दुकानदाराचा नाव कमी केल्याचा दाखला, मूळ रेशन कार्ड, आधार कार्ड
४) नवीन रेशन कार्ड (New Ration Card):
रेशन दुकानदाराचा दाखला, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, सेतूचा उत्पन्न दाखला, पत्नीचा माहेरचा नाव कमी केल्याचा दाखला, लाईट बिल/नमुना नं. ८/भाडे पावती/घरमालकाचे संमतीपत्र, राष्ट्रीयकृत बँक पासबुक (ऑनलाईन) व गॅस पुस्तकाची झेरॉक्स प्रत, शेजारील २ रेशन कार्ड झेरॉक्स, २ पासपोर्ट फोटो तसेच विभक्त करण्यासाठी जुन्या रेशन कार्डमधील नाव कमी केल्याचा दाखला.
या सामाजिक उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून अनेक कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे. लोकनेते स्व. पप्पूदादा युवा फाउंडेशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांवर काम केले आहे. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी सातत्याने राबविले जाणारे असे उपक्रम समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहेत.
विशेष म्हणजे, या शिबिराच्या आयोजनामागे फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम लक्ष्मण मांडोळे यांची दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. युवकांना सोबत घेऊन समाजकारणाची नवी दिशा देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे स्व. पप्पूदादा युवा फाउंडेशन आणि अध्यक्ष शुभम लक्ष्मण मांडोळे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून समाजासाठी आदर्श ठरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
गणेश कोल्हे – ७३५०५०१३०७
शुभम लक्ष्मण मांडोळे (अध्यक्ष) – ८५५०९०७५१४
नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments