मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव तालुक्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असून काही गॅस विक्रेत्यांकडून काळाबाजार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक फसवणूक होत आहे.
सध्या सुमारे ₹900 किंमतीचा घरगुती गॅस सिलेंडर हा काही विक्रेत्यांकडून ₹2000 पर्यंत विकला जात असून, ग्राहकांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे. तसेच, घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांकडून सर्रास वापरले जात आहेत. परिणामी सामान्य ग्राहकांना “गॅस टंचाई”चे कारण देऊन सिलेंडर देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
संबंधित गॅस एजन्सी व विक्रेत्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
पुरवठा अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून नियमित तपासणी करावी.
गॅस एजन्सी मालकांचे स्टॉक मेंटेन रजिस्टर तपासण्यात यावे.
शंका आल्यास संबंधित ठिकाणी धाड टाकून कठोर कारवाई करण्यात यावी.
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
तसेच, केंद्र सरकारने गॅस सिलेंडरवरील झालेली भाववाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा.
वरील बाबींवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
निवेदनावर राष्ट्रीय जनमंच पक्षाचे
महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर वाघ, महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे, जळगाव जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग अरून सपकाळे, जळगाव जिल्हा कायदेशीर सल्लागार आघाडी प्रमुख अँड महेश मोरे,
जळगाव जिल्हा सचिव अमृत सैंदाणे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष सुरेश वेळीस, भडगाव तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील,चाळीसगाव तालुका
माजी सैनिक कल्याण आघाडी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण नाडार, चाळीसगाव तालुका
बांधकाम आघाडी प्रमुख अमोल पाटील, चाळीसगाव शहर अध्यक्ष अधिकार पाटोळे, बाळकृष्ण मोरे, दीपक राजपूत, प्रमोद पाटील, भालेराव पाटील, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments