मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
पत्रकार जावेद शाह (नागरदेवळा) यांच्याशी झालेल्या शिवीगाळ प्रकरणी संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात, चोपडा तहसीलदार यांच्या माध्यमातून जळगाव जिल्हाधिकारी तसेच चोपडा पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली. या अर्जात संबंधित व्यक्तींनी केलेल्या अशोभनीय वक्तव्यांचा उल्लेख करून पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, उपविभागीय अधिकारी फैजपूर यांच्या माध्यमातूनही जळगाव जिल्हाधिकारी तसेच फैजपूर पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. या द्विस्तरीय तक्रारीमुळे प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सदर प्रकरणात पत्रकार जावेद शाह यांना न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकार संरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments