मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
रांजणगाव प्रतिनिधी:- गणेश चौधरी
रांजणगाव येथील श्री सदगुरू माधवगिरी महाराज अभ्यासिकेची विद्यार्थिनी तसेच सन्मित्र बाळू भाऊ मोरे यांची सुकन्या कुमारी साक्षी बाळू मोरे हिची मुंबई लोहमार्ग पोलिस दलात सार्थ निवड झाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. तिच्या या यशामुळे रांजणगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
साक्षीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. अभ्यासिकेत नियमितपणे अभ्यास करत असताना तिने स्वतःवर विश्वास ठेवून सतत प्रयत्न केले. तिच्या या यशामागे आई-वडिलांचे कष्ट, मार्गदर्शन आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. विशेषतः तिचे वडील बाळू भाऊ मोरे यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि कोणत्याही अडचणींना न घाबरता पुढे जाण्याची शिकवण दिली.
मुंबई लोहमार्ग पोलिस दलात निवड होणे ही केवळ नोकरी नसून जबाबदारीची मोठी संधी आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काम करताना साक्षी निश्चितच आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल, असा विश्वास सर्वांना आहे. तिच्या या यशामुळे गावातील इतर मुलींनाही प्रेरणा मिळाली असून “मेहनत केली तर यश मिळतेच” हा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला आहे.
साक्षीच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच अभ्यासिकेतील शिक्षकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. भविष्यात ती आणखी मोठ्या उंचीवर पोहोचो आणि आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल करो, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
साक्षी बेटा, तुझे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments