मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव रेल्वे पुलावर अपघातांची मालिका; तात्काळ उपाययोजनांची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे चाळीसगाव रेल्वे पुलावर अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीवित व मालमत्तेची हानी सहन करावी लागत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः अरुंद रस्ता, वेगाने धावणारी वाहने आणि अपुरी वाहतूक व्यवस्था ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर एक जागृत नागरिक व पत्रकार म्हणून सुनीता राजेंद्र महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांना ऑनलाईन अर्ज सादर करून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी पुलावर मजबूत डिव्हायडर उभारणे, स्पष्ट व लक्षवेधी सूचना फलक बसवणे, वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणणे आणि वाहतूक पोलीसांची नियमित तैनाती करणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली आहे.
जागरूकता व सामाजिक बांधिलकी जपत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेणाऱ्या सुनीता महाडिक यांचे हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.
तसेच वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेत योग्य पावले उचलली गेल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत होऊ शकतो. सध्या या गंभीर प्रश्नावर प्रशासन कोणती कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments