Type Here to Get Search Results !

मंत्रिमंडळ फेरबदलात शिक्षण मंत्री किंवा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून आ. किशोर आप्पा पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा; तर रावसाहेब जिभू पाटील भावी आमदार म्हणून चर्चेत, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला नवी उंची देणारी जोडी ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



शिक्षण मंत्री किंवा पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री म्हणून आ. किशोर आप्पा पाटील यांची वर्णी लागणार?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; पाचोरा-भडगावच्या नेतृत्वाकडे राज्याचे लक्ष


मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, शिवसेना (शिंदे गट) पक्षातील काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमार कामगिरी, सातत्याने वादग्रस्त ठरणारी विधाने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील अपयश आणि जनतेमधील वाढती नाराजी यामुळे काही मंत्र्यांची गच्छंती जवळपास निश्चित मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे.


राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा गंभीर विचार सुरू असून, अभ्यासू, शांत, विकासाभिमुख आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिक्षण मंत्री किंवा पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांसाठी किशोर आप्पा पाटील यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे.


गेल्या काही वर्षांत किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघात विकासकामांचा अक्षरशः धडाका लावला आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक सुविधा, आरोग्यसेवा, शेतकरी प्रश्न आणि युवकांच्या रोजगाराच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनासोबत थेट बैठका घेतल्या. त्यामुळे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्यासाठी त्यांचे नाव चर्चेत असणे हे स्वाभाविक मानले जात आहे.


शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. गरीब विद्यार्थ्यांना मदत, शाळांच्या समस्या सोडवणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे आणि शिक्षण क्षेत्राचा अभ्यास असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यासाठीही ते एक मजबूत दावेदार मानले जात आहेत.


महायुती सरकारमध्ये काही ‘वाचाळवीर’ मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सतत वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या काही नेत्यांवर वरिष्ठ नेतृत्व नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही मंत्र्यांच्या खात्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे जनतेत नाराजी वाढत आहे. आगामी निवडणुकांचा विचार करून सरकार आता स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.


अशा परिस्थितीत किशोर आप्पा पाटील हे शांत, संयमी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते म्हणून समोर येत आहेत. कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आणि सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्याही वेळी उपलब्ध राहण्याची त्यांची शैली यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात “आप्पा म्हणजे विकास” अशी प्रतिमा तयार झाली आहे.


शिवसेना संघटनेतही त्यांचे वजन वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनेक ज्येष्ठ नेतेदेखील त्यांच्या नावाबाबत सकारात्मक असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. जर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळाली, तर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.


दरम्यान, पाचोरा-भडगाव परिसरात किशोर आप्पा पाटील यांच्या संभाव्य मंत्रिपदाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावागावांत चर्चा सुरू असून, “आप्पांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.


भडगाव तालुक्याचे भावी आमदार म्हणून रावसाहेब जिभू पाटील यांच्याकडे वाढता जनतेचा विश्वास


पाचोरा-भडगावच्या राजकारणात उदयोन्मुख नेतृत्व म्हणून रावसाहेब जिभू पाटील यांचे नाव अत्यंत वेगाने पुढे येताना दिसत आहे. शांत, संयमी, लोकांमध्ये मिसळणारे आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज भडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांच्याकडे “भावी आमदार” म्हणून पाहिले जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.


रावसाहेब जिभू पाटील यांनी समाजकारणातून आपला प्रवास सुरू केला. कोणताही गाजावाजा न करता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी विश्वास जिंकला. शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे.


विशेष म्हणजे, किशोर आप्पा पाटील यांच्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि विकासाच्या राजकारणाबाबत असलेली समान भूमिका यामुळे त्यांचे राजकीय वजन वाढत आहे. मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते उघडपणे सांगतात की, “किशोर आप्पांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे रावसाहेब भविष्यात मोठे नेतृत्व बनू शकतात.” इतकेच नव्हे तर, स्वतः किशोर आप्पा पाटील देखील त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


तरुणांमध्ये रावसाहेबांची लोकप्रियता प्रचंड वाढताना दिसत आहे. गावागावांतील सामाजिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे आणि जनसंपर्क मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे ते केवळ राजकीय चेहरा न राहता लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत.


राजकीय जाणकारांच्या मते, आगामी काळात भडगाव तालुक्यातील राजकारणात रावसाहेब जिभू पाटील हे अत्यंत महत्त्वाचे नाव ठरू शकतात. युवकांना एकत्र आणण्याची क्षमता, संघटन कौशल्य आणि लोकांमधील स्वीकारार्हता यामुळे त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहिले जात आहे. अनेक गावांमध्ये “रावसाहेबांना संधी मिळाली पाहिजे” अशी भावना निर्माण झाली आहे.


जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला मोठ्या उंचीवर नेणारी जोडी राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळात जळगाव जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत करण्यामध्ये किशोर आप्पा पाटील आणि रावसाहेब जिभू पाटील यांची जोडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ग्रामीण भागातील मजबूत जनसंपर्क, विकासकामांवरील भर, युवकांमधील वाढता प्रभाव आणि संघटनात्मक ताकद यामुळे ही दोन्ही नेतृत्वे भविष्यात जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.


या दोन्ही नेतृत्वांना त्यांची बहीण, समाजरत्न पुरस्कृत समाजसेविका तथा Live नवं विचार Newsच्या मुख्य संपादक सुनिता राजेंद्र महाडिक यांची भक्कम साथ लाभत आहे. पत्रकारिता, समाजकारण आणि संघटनात्मक क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या Live नवं विचार Newsच्या मुख्य संपादक असून, आयडियल पत्रकार संघ ठाणे जिल्हाध्यक्ष, ठाणे जिल्हा पत्रकार संघ सदस्य, दैनिक अहिल्याराज पत्रकार, व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सचिव, हिंदी मराठी पत्रकार संघ चाळीसगाव तालुका संघटक, महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटना प्रदेश कार्यकारणी सदस्य, न्यूज जनरलिस्ट असोसिएशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट) जळगाव जिल्हा सदस्य, जिजाऊ ब्रिगेड सदस्य चाळीसगाव तसेच हिरकणी महिला मंडळ सदस्य म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.


सामाजिक, पत्रकारिता आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या सुनिता महाडिक यांच्या अनुभवाचा आणि पाठिंब्याचा मोठा फायदा किशोर आप्पा पाटील आणि रावसाहेब जिभू पाटील यांच्या नेतृत्वाला होत असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात ही तिन्ही नावे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठे समीकरण निर्माण करू शकतात, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments