Type Here to Get Search Results !

रावेरमध्ये दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक; शस्त्रांसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



रावेर शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा संशयितांना रावेर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू-ड्रायव्हर, पिंचीस, सुती दोरी, बनावट नोटांची बंडले आणि कार असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयितांचा डाव उधळला गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाल गावाकडून आभोडा मार्गे येणारी मारुती सुझुकी कार (एमएच-१९-२४०३) भरधाव वेगाने रावेर शहरातून जात होती. कारचा वेग आणि संशयास्पद हालचाली पाहून नागरिकांनी तिच्यावर लक्ष ठेवले. आठवडे बाजार


पश्मिरातील जन्या नाल्याजवळ महामार्गाकडे 

परिसरातील जुन्या नाल्याजवळ महामार्गाकडे वळताना कार चिखलात अडकल्याने संशयितांचा पुढील बेत फसला. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाडस दाखवत कारमधील तिघांना पकडून रावेर पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत आरोपींची ओळख निखिल प्रवीण पाटील (वय २०), अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. घोडबंदर, जि. ठाणे) आणि मेहेरबान जहागीर तडवी (रा. पाल) अशी झाली.

कारची झडती घेतली असता पोलिसांना तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू-ड्रायव्हर, पिंचीस, सुती दोरी तसेच लहान मुलांच्या खेळातील बनावट नोटांची बंडले आढळून आली. याशिवाय सुमारे तीन लाख रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली. जप्त करण्यात

आलेल्या साहित्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.


या प्रकरणी पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या टोळीतील इतर फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Post a Comment

0 Comments