Type Here to Get Search Results !

Crime News : तरुणावर भर रस्त्यात कोयत्याने हल्ला; भरदिवसा झालेल्या हत्येने अंबरनाथ हादरलं


 मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 

एमआयडीसीत कामावर जात असलेल्या तरुणावर भर रस्त्यात जुन्या वादातून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे अंबरनाथमध्ये भितीचं वातावर निर्माण झालं आहे,

अंबरनाथ : एमआयडीसीत कामावर जात असलेल्या तरुणावर भर रस्त्यात जुन्या वादातून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. बुधवारी मार्च रोजी घडलेल्या कोयता हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. लालमनी यादव असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे, लालमनी यादव हे बुधवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान सायकल कंपनी येथून अंबरनाथ एमआयडीसीत कामावर जात होते.

भरदिवसा जीवघेणा हल्ला

यावेळी कल्याण- बदलापूर महामार्गावर पाठीमागून दुचाकीने आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर लाकडी दांडके, धारदार कोयता आणि फायटर सारख्या शस्त्रांनी हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले लालमनी यादव हे रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडले. निपचित पडलेल्या लालमनी यांना पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. भरदिवसा झालेल्या या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हत्येमागचं नेमकं कारण काय ?

दरम्यान याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात लालमनी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालमनी यांच्या ओळखीचे दीपक गिरी आणि त्याच्या दोन साथीदारांनी जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लालमनी यादव यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दीपक गिरी आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दीपक गिरी आणि लालमनी यादव यांच्यात होळीपूर्वी काही कारणावरून वाद निर्माण झाले होते. त्याच वादातून आरोपींनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलीसांकडून सविस्तर तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments