Type Here to Get Search Results !

Ambernath News : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पोहण्याचा मोह जिवावर बेतला; अंबरनाथमधील उल्हास नदीत दोन तरुण बुडाले

 

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


अंबरनाथमध्ये उल्हास नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शांतीसागर रिसॉर्टच्या मागे वसत बंधाऱ्यावर हे दोन तरुण बुडाले आहे.

अंबरनाथमध्ये उल्हास नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शांतीसागर रिसॉर्टच्या मागे वसत बंधाऱ्यावर हे दोन तरुण बुडाले आहे. त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाने काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार दोन्ही तरुण हे पवई हिरानंदानीमध्ये राहणारे आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, विवेक तिवारी आणि विनायक शहा अशी या दोघांची नावं असून ते अनुक्रमे 18 आणि 17 वर्षांचे आहेत. पवई हिरानंदानीमध्ये राहणारे हे दोघे मित्रांसह पिकनिकसाठी अंबरनाथच्या वसत गावाजवळील उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर आले होते. तिथे उल्हास नदीत पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने तिथे धाव घेत या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेमुळे पुन्हा एकदा उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरणं धोकादायक असल्याची बाब समोर आली असून त्यामुळे पर्यटकांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय.

Post a Comment

0 Comments