मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
अंबरनाथ स्थानकावर एक धक्कादायक अपघात घडला आहे. लोकल पकडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. वेगात असलेल्या लोकलमध्ये चढताना तरूणाचा तोल जाऊन तो थेट प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मधल्या फटीत अडकला आहे. या दुर्घेटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये एका तरूणाचा अपघाती मृत्यू झाला होता. आता असाच काहीसा अपघात अंबरनाथ स्थानकावर घडला. या घटनेमुळे धावती ट्रेन पकडणं किती धोकादायक आहे, पुन्हा एकदा समोर आले आहे.
अंबरनाथवरून सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सीएसएमटीसाठी फास्ट लोकल रवाना होते. ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येत असताना एक प्रवासी धावती लोकल पकडण्यासाठी धावला. मात्र, लोकलचा वेग अधिक असल्याने त्याचा तोल गेला आणि तरूण खाली पडला. तरूण धावती लोकल पकडताना प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला.
यादरम्यान, लोकलचे २ ते ३ डबे त्याच्या अंगावरून पुढे गेले. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि त्या प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरपीएफने त्याला बाहेर काढत उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.
ही घटना स्पष्टपणे दाखवते की, चालत्या लोकलध्ये चढण्याचा धोका किती मोठा असू शकतो. केवळ जागेच्या घाईसाठी आपलं आणि इतरांचा आयु्ष्य धोक्यात घालणं किती घातक ठरू शकतं, याचं हे गंभीर उदाहरण आहे.

Post a Comment
0 Comments