मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
चाळीसगाव( वार्ताहार)येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की ,भारताचे महान शिक्षण तज्ञ आणि समाज सुधारक, सत्यशोधक ,क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष अनिताताई शिंदे यांनी पुष्पहार अर्पण उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन करून महात्मा फुले यांचा जयजयकार करण्यात आला.यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनावर जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांनी प्रकाशझोत टाकला.
याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई शिंदे, पत्रकार किशोर जाधव, योगेश मोरे,तालुका युवक अध्यक्ष प्रकाश पाटील,तालुका उपअध्यक्ष ललित पाटील, शहर संघटक किरण जाधव,संतोष कोल्हे,सचिन गुंजाळ, कृष्णकांत पाटील, दिपक पाटील, उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments