मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
अंबरनाथ : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेईना. महिला, तरुणींसोबत लहान मुले देखील सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. शहापुरातील १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराची झाल्याची घटना ताजी असताना अंबरनाथमध्येही संतापजनक प्रकार घडला आहे. अंबरनाथच्या प्रकाश नगरमध्ये ७ वर्षीय मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरातील प्रकाश नगर झोपडपट्टीत २० एप्रिल रोजी हा संतापजनक प्रकार घडलाय. प्रकाश नगरात एक ७ वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. त्याचवेळी त्याच्यावर शेजारी राहणाऱ्या नराधमाची नजर पडली. या नराधमाने त्याला चॉकलेट आमिष देऊन घरात बोलवलं. त्यानंतर नराधमाने ७ वर्षीय मुलावर अत्याचार केला.
घटनेची माहिती मिळताच मुलाच्या आई-वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या नराधमाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून नराधमाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, शहापूरच्या वालशेतमध्ये १३ वर्षीय भयंकर घटना घडली आहे. गणवेश देतो, आधारकार्ड देतो आणि दोन हजार रुपये मिळतील असे आमिष देऊन एकाने आदिवासी पाड्यातील मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने पडघा परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment
0 Comments