मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्राची राज्य सुट्टी आहे.१ मे हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून १मे महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषणे तसेच समारंभांशी संबंधित आहे. तसेच इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरे करतात. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये १ मे हा दिवस खूप उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.
अश्या या विशेष दिवशी महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे ग्रामीण चे लाडके आमदार यांना तहसील कार्यालय धुळे येथे झेंडा वंदन करण्याचा सन्मान मिळाला.
या सन्माना बद्दल रामदादांनी आभार व्यक्त केले.
या मंगलप्रसंगी तहसीलदार श्री. अरुण शेवाळे आणि सर्व तशसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments