दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी नाईट राउंड व नाकाबंदी ड्युटीवर असताना मालेगाव रोडवरील धुळे ते छत्रपती संभाजी नगर बायपास चौफुली येथे वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान एक पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर MH 12 KM 2305 गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीच्या डिक्की मध्ये निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्या गांजा सारख्या वास असलेला पदार्थ आढळून आला.
सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्वतः घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई सुरुवात केली.
फॉरेन्सिक पथक व पंच समक्ष झालेल्या तपासणीत सदर पदार्थ अमली पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी, नदीम शेख बशीर वय वर्ष 40 राहणार गुलवाणी खालदा गल्ली नंबर 3 मालेगाव जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले. सदर गांजाचे एकूण वजन 42 किलो 583 ग्रॅम आहे व त्याचा अंदाजे बाजार मूल्य 24 लाख 69 हजार 150 इतका आहे. तसेच वाहतूक साठी वापरलेली गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी NDPS कायदा कलम 820 बी 29 अन्वये चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, पोलीस अधीक्षक राजेश चंदन यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकामध्ये पुढील अधिकारी व कर्मचारी यांनी तडफदार सहभाग दिला पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर पोलीस हवालदार राहुल सोनवणे, विनोद पाटील, योगेश बेलदार, अजय पाटील, पोलीस नाईक भूषण पाटील, नितीन आगोने, महेंद्र पाटील,नरेंद्र चौधरी, अमोल भोसले, निलेश पाटील, नाना बच्धे, आशुतोष सोनवणे, विजू पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, दीपक चौधरी, पवन पाटील, महिला पोलीस सर्वांनी टीमवर्क दक्षता धाडसाच्या जोरावर ही कामगिरी यशस्वी करून दाखवली.
चाळीसगावच्या सर्व पोलीस बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments