मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
जिंगरवाडीतील नागरी समस्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त.
जिंगरवाडी दिनांक:- ११-०५-२०२५– जिंगर वाडी परिसरातील नागरिक सध्या कचरा आणि गटारी व्यवस्थापनाच्या अभावामुळे गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. या भागात अद्यापही गटारींची सुविधा उपलब्ध नाही, तसेच कचऱ्याचे नियमित व्यवस्थापन होत नसल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी यासंदर्भात नगरपालिकेकडे लेखी स्वरूपात अर्ज करूनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला आहे.
“आम्ही अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. ना गटारी आहेत, ना कचऱ्याचे नियमित संकलन. रोगराईचा धोका वाढला आहे आणि लहान मुलं व वयोवृद्ध यांचे आरोग्य धोक्यात आलं आहे,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
जिंगरवाडी येथे मुलभूत नागरी सुविधा अद्यापही उपलब्ध नाहीत.
Post a Comment
0 Comments