Type Here to Get Search Results !

जिंगरवाडीत गटार व कचऱ्याच्या समस्या वरून नागरिक संतप्त


मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


प्रतिनिधि:- राकेश निकम 


जिंगर वाडीत गटार व कचऱ्याच्या समस्येवरून नागरिक संतप्त


 चाळीसगाव तालुक्यातील घाट रोडवरील जिंगर वाडी परिसरात गटाराची सफाई आणि कचऱ्याचे संकलन नीट न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गटारातील सांडपाणी रस्त्यावर साचत असून, कचरा वेळेवर न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डास-माशांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, अशा आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे.


स्थानिक नागरिकांनी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. प्रशासनाकडून केवळ "विजय जाधव या कंत्राटदाराला भेटा आणि बोला" असे उत्तर दिले जात आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार विजय जाधव यांना फोन केल्यास ते कॉल उचलत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संताप निर्माण झाला आहे.


"आम्ही दरवेळी फक्त आश्वासनांवर समाधान मानायचं का? समस्या त्वरित न सोडवल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल," असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि कंत्राटदाराने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

Post a Comment

0 Comments