मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 2025 : राज्यात मान्सून दाखल झाला असून पावसाने अनेक भागात थैमान घातलं आहे. पावसाच्या ताज्या अपडेट्ससह,
Maharashtra Breaking News In Marathi : मुंबईसह
राज्यभरात मान्सून दाखल झाला असून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आगमनाला पावसाने राज्यभरातील विविध ठिकाणी दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं आहे. मान्सून दाखल होताच पावसाने तुफान हजेरी लावली असली, तरी काही दिवसांत पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच हवामान विभागाने देशभरात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक भागात मे महिन्यात अशाप्रकारे सर्वाधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे संपूर्ण राज्य वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येने हादरलं आहे. लाखो रुपये हुंडा देऊनही आणखी पैशांसाठी सासरच्यांकडून छळ करण्यात आल्याचा भयंकर प्रकार पुण्यात समोर आला. या घटनेने राज्यभरात संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा होण्याची मागणी होत आहे.
Konkan Rain : कोकणातील किनारपट्टी भागात लाखो रुपयाचे नुकसान, कौल, पत्रे उडाली फळ झाडांचेही मोठे नुकसान
कोकणात मान्सूनपूर्व पावसाने कोट्यावधी रुपयांचं यंदा नुकसान झालं आहे. या सगळ्या घटना ताज्या असतानाच आता मान्सून दाखल झाल्यानंतरही पावसाचे तांडव पाहायला मिळाले. गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी झाला असतानाच बुधवारी संध्याकाळी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किनारपट्टी एरियाला वादळी वाऱ्याने व पावसाने जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे दापोली तालुक्यातील किनारपट्टी परिसरात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. तर फळझाडांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Post a Comment
0 Comments