चाळीसगावमध्ये जिंगर वाडी येथे कचऱ्याच्या समस्येवर तातडीने उपाय – नागरिकांनी व्यक्त केला समाधान
चाळीसगाव – शहरात काही दिवसांपासून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येऊन चाळीसगाव नगरपालिकेत तक्रार अर्ज सादर केला.
तक्रार मिळताच कॉन्ट्रॅक्टर (मुकादम) विजय जाधव व एस. आय. विजय जाधव यांनी तातडीने कृती करत परिसरातील कचरा साफ करून घेतला. या तत्परतेमुळे परिसर पुन्हा स्वच्छ झाला असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
या वेळी नागरिकांनी विजय जाधव यांचे मन:पूर्वक आभार मानले आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली.

Post a Comment
0 Comments