पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून शत्रूंना दिलेल्या करारा प्रत्युत्तर आणि मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ चाळीसगावात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी 09:30 वाजता या भव्य तिरंगा यात्रेला चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून सुरुवात होणार आहे. ही यात्रा पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावकार चौक, जुने तहसील कार्यालय, अंधशाळा मार्ग, वीर भाई कोतवाल चौक, कॅप्टन कॉर्नर मार्गे पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर समारोप होइल
ही तिरंगा यात्रा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाची किंवा संघटनेची नसून, ही चाळीसगावकर नागरिकांची भारतीय सेनेप्रती असलेली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करणारी आहे, असे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले.
शहरवासीयांमध्ये या यात्रेबाबत मोठा उत्साह दिसून येत असून, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा संदेश देणार आहेत.







Post a Comment
0 Comments