Type Here to Get Search Results !

स्थानिक पत्रकारितेत भरीव योगदानाबद्दल सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांना 'इंडियन एक्सलन्स अवॉर्ड द्वारे सन्मान











मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


उप संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 



आज आमच्या लाईव्ह नवविचार न्यूज च्या मुख्य संपादक सुनीता राजेंद्र महाडिक यांना इंडियन एक्सलन्स आवड द्वारे सन्मानित करण्यात आला 


या वेळी हिंदी मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष धनश्री ताई काटीकर पाटील, मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री संदीप काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट चे नेते, कोलते महाविद्यालय कॉलेजचे प्राध्यापक व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.



स्थानिक पत्रकारितेत भरीव योगदानाबद्दल सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांना 'इंडियन एक्सलन्स अवॉर्ड' 

पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती, दै.अहिल्याराज वर्धापन दिन व हिंदी पत्रकार दिवस निमित्त 

— दैनिक अहील्याराज तर्फे गौरव

स्थानिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम करणाऱ्या सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांना 'इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2025' ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना 1 जून 2025 रोजी मलकापूर येथे एका खास समारंभात प्रदान करण्यात आला. 


सौ. महाडिक यांनी गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर पत्रकारितेमध्ये सक्रीय भूमिका बजावत अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडली आहे. जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि तळमळीच्या पत्रकारितेमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.

दैनिक अहील्याराज तर्फे दिला जाणारा ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड’ हा समाजहितासाठी अपार मेहनत करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

हा सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली पावती असून, त्यांनी उभ्या केलेल्या पत्रकारितेच्या व्रताला अधिक बळ मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments