Type Here to Get Search Results !

जळगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार रात्रीच्या सुमारास एका ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात

 

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 

जळगाव- अकोला


राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले, तरीही स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.



वा जेच्या सुमारास सिहोरी ट्रॅव्हल या कंपनीची लक्झरी बस सुरतहून निघून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जात होती. कोथळी गावाला लागून असणाऱ्या हायवे उड्डाण पुलावर या बसने समोरून जात असलेल्या ट्रकला जोरदार धडका दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत.




अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.


जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


पोलिसांनी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Post a Comment

0 Comments