Type Here to Get Search Results !

छ.शाहू महाराज जयंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने साजरी

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


 चाळीसगाव (वार्ताहार) राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महा संघाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे  की, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या.जयंतीनिमित्ताने २६ जून 2025 रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजननाचे आयोजन करण्यात आले होते ..यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे  यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू  यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले.राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जय जयकार केला. यावेळी चाळीसगाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज  यांच्या जीवनावर आपल्या मनोगतात प्रकाशझोत टाकला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,तालुका उप अध्यक्ष अमोल पाटील,तालुका संघटक शेखर पाटील, आदी अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments