Type Here to Get Search Results !

चाळीसगावला नवे पोलिस निरीक्षक: अमित मनेळ यांची नियुक्ती

 

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक



"शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व चाळीसगावला लाभले – अमित मनेळ सरांना पुढील वाटचालीस यश मिळो हीच सदिच्छा!"



चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अमित मनेळ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे.


अमित मनेळ हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून राज्यभर ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी गुन्हे शोध विभाग, वाहतूक शाखा व ग्रामीण भागातील विविध पोलिस ठिकाणी जबाबदारीने सेवा बजावली आहे. जनतेशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी घेतलेले कठोर पावले ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहेत.


नव्या पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तीमुळे चाळीसगावमध्ये कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. शहरातील गुन्हेगारी रोखणे, वाहतूक सुधारणा, आणि युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे या गोष्टींवर ते विशेष लक्ष केंद्रित करतील, अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments