उप संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
ठाणे | दिनांक – १२ जुलै २०२५
प्रामाणिक पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड नेतृत्व याचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांची "आयडियल पत्रकार संघटना – ठाणे जिल्हा महिला प्रकोष्ठाच्या अध्यक्षपदी" नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड केंद्रीय संयुक्त सचिव श्रीमती जमुना चल्हाण, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अजयकुमार मिश्रा, राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदम, संपर्क प्रमुख लक्ष्मण सूर्यवंशी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय राय यांच्या सल्लामसलतीनंतर एकमताने करण्यात आली आहे.
ही अवैतनिक नियुक्ती असून ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
✍️ पत्रकारितेतील प्रभावशाली कामगिरी:
सुनिता महाडिक या "दैनिक आहिल्याराज पत्रकार" या वृत्तपत्राच्या कार्यकारी पत्रकार आहेत, जिथे त्या महिला, ग्रामीण आणि सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भाष्य करतात.
त्या "Live नवं विचार News" या ऑनलाईन पोर्टलच्या मुख्य संपादक आहेत, जिथे नवे विचार, निर्भीड मतं आणि सकारात्मक बदल या ध्येयाने पत्रकारिता करतात.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या सक्रिय सदस्या म्हणून त्या अनेक पत्रकार उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिल्या आहेत.
💪 राजकीय आणि सामाजिक नेतृत्व:
भाजपा महिला मोर्चा यामध्ये कार्यरत राहून त्यांनी महिला सबलीकरणासाठी संघर्ष केला आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आर्योंग आर्योंग संघटना यामध्ये सदस्य म्हणून संस्कार,आणि आत्मनिर्भरतेसाठी व उपक्रम राबवले आहेत.
🏆 पुरस्कारांनी गौरवलेले योगदान:
Indian Excellence Award 2025
समाजरत्न पुरस्कार – नवं स्वराज्य, देवळी संस्थेचा
National Icon Award 2025 (लवकरच प्रदान होणारा)
हे पुरस्कार त्यांच्या सत्यनिष्ठ पत्रकारितेच्या, सामाजिक कार्याच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यगौरवाची जिवंत साक्ष आहेत.
🌺 सौ. सुनिता महाडिक – एक प्रेरणास्तंभ
त्यांच्या लेखणीला धार आहे, भाषेला आवाज आहे आणि भूमिकेला ठामपणा आहे. त्या केवळ पत्रकार नाहीत, तर एक स्त्रीशक्तीचा प्रतिक, सामाजिक बांधिलकीचा मानबिंदू आणि सत्यासाठी लढणारी योध्दा आहेत.
त्यांची ही निवड अनेक नवोदित महिला पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरेल, आणि "महिला पत्रकारितेला" नवसंजीवनी देईल, असा विश्वास संपूर्ण पत्रकार परीवाराने व्यक्त केला आहे.
🎉 संपूर्ण पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रामधून त्यांना यशासाठी भरभरून शुभेच्छा आणि अभिनंदन!
"स्त्रीशक्तीच्या या लढवय्या प्रतिनिधीला मनःपूर्वक सलाम!"

Post a Comment
0 Comments