मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
उप संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
अंबरनाथ
पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमठवणाऱ्या आणि सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणाऱ्या सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांची नुकतीच आयडियल पत्रकार संघ तर्फे ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या या यशस्वी नियुक्तीनंतर अंबरनाथ शहर भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुख व भावी नगरसेविका सौ. स्वप्नाली शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ व शाल देऊन भव्य सन्मान केला.
सौ. स्वप्नाली शिंदे या अंबरनाथ येथील भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) शक्ती केंद्र प्रमुख म्हणून अत्यंत प्रभावी कार्य करीत आहेत. त्यांचे नेतृत्व, संयोजनकौशल्य आणि सामाजिक प्रश्नांवरील संवेदनशीलता यामुळे त्या स्थानिक राजकारणात एक दृढ आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.
संघटनात्मक ताकद, सामाजिक भान गरजू महिला आणि युवकांसाठी अनेक उपक्रम राबवले, शहरातील विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग केला, महिलांसाठी प्रेरणा व नेतृत्व केले आहे
या सन्मान सोहळ्यात आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली – सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांना भाजपा अंबरनाथ शहर सोशल मीडिया प्रमुख या पदाची अधिकृत जबाबदारी सोपवण्यात आली
सौ. सुनिता राजेंद्र महाडिक या Live नवं विचार या डिजिटल न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादक, दैनिक अहिल्याराजच्या कार्यकारी पत्रकार, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या, तसेच भाजपा महिला मोर्चा सदस्या व आता ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असून, त्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
या भेटीत घरोघरी भाजपाचा संदेश पोहचवण्यासाठी रणनीती, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, महिलांचा सहभाग आणि तरुणांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्याच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी अंबरनाथ वॉर्ड क्रमांक 27 मधील भाजपा महिला विभागाच्या काही प्रमुख सदस्या देखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचे अभिनंदन करत, त्यांच्याकडून आगामी काळात प्रभावी नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली.
सौ. स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले की,
"सौ. सुनिता महाडिक यांच्यासारखी सशक्त, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्ती भाजपात आल्याने पक्षाला एक नवी दिशा व बळ मिळेल. त्यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये अधिक व्यापक पातळीवर जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे बळ वाढेल."
हा सोहळा केवळ सन्मान नव्हता, तर अंबरनाथच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.




Post a Comment
0 Comments