मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
चाळीसगाव शहरालगत असलेल्या बोढरे फाटा येथे आज महामार्ग पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान एक मोठा ड्रग्ज तस्करीचा प्रकार उघडकीस आला. तपासणीदरम्यान एका संशयास्पद वाहनातून ३९ किलो अँफेटामाईन हा अतिशय धोकादायक आणि प्रतिबंधित अमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तत्काळ वाहन व चालकाला ताब्यात घेतले असून, प्राथमिक माहितीनुसार सदर अमली पदार्थ दिल्ली येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे बेंगळुरूकडे नेला जात होता. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४० ते ५० कोटी रुपयांदरम्यान असल्याचा अंदाज आहे.
ही घटना घडल्यानंतर चाळीसगावचे आमदार मा. मंगेश दादा चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, "अंमली पदार्थांचा पुरवठा वाढवून देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याचे आणि देश खिळखिळा करण्याचे षड्यंत्र देशविरोधी शक्तींनी रचले आहे. याविरोधात कठोर कारवाई आवश्यक आहे."
पुढे मंगेश दादा यांनी सांगितले की,
घटनास्थळावरून मी स्वतः तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांना फोन करून घटनेची माहिती दिली असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती केली आहे.
तसेच, राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी देखील या कारवाईची गांभीर्याने दखल घेतली असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल चाळीसगाव पोलीस निरीक्षक श्री. अमित कुमार मनेळ तसेच चाळीसगाव पोलीस दलाचे विशेष अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. त्यांच्यामुळे एक मोठा अमली पदार्थांचा साठा देशात पोहोचण्यापूर्वीच हाती लागला आहे.
ही कारवाई “ड्रग्जमुक्त महाराष्ट्र” या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेला बळ देणारी ठरली असून, संपूर्ण पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
खरच आम्ही अशा खंबीर आणि सजग पोलिस दलामुळेच सामान्य नागरिक आज निर्धास्तपणे जीवन जगू शकतो. चाळीसगाव पोलिसांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन! करतो






Post a Comment
0 Comments