मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
पाचोरा │ जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी आणि आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन सतत चर्चेत असते. यावर्षी त्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख पाऊल उचलत पाचोरा शहरातील नागरिक व नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ₹४५०० किंमतीची मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून दिली आहे.
हा उपक्रम २० जुलै २०२५, रविवार रोजी शिवतीर्थ, जयकिसान सोसायटी, पाचोरा येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत पार पडणार आहे. या शिबिरात पाचोरा चे लाडके आमदार श्री किशोर आप्पा पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
🩺 तपासणीमध्ये समाविष्ट सेवा:
रक्तदाब, शुगर, कोलेस्टेरॉल
ईसीजी, हिमोग्लोबिन, किडनी व लिव्हर फंक्शन टेस्ट
तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला व औषधोपचार
🟢 बंडूभाऊ सोनार यांचे विशेष कौतुक...
बंडूभाऊ सोनार हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हे, तर भावी नगरसेवक म्हणून सक्षम, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून लोकांमध्ये ठाम विश्वासाने ओळखले जात आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत लोकांचे आरोग्य, सुविधा आणि सेवा या गोष्टी सर्वोच्च ठिकाणी आहेत. वाढदिवसाच्या दिवशी देखील त्यांनी कोणताही उत्सव न साजरा करता, आरोग्य शिबिरासारखा विधायक कार्यक्रम देऊन समाजासाठी आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.
🗣️ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बंडूभाऊ सोनार यांनी केले आहे.
माझा वाढदिवस म्हणजे लोक सेवेची एक संधी असे सांगत बंडूभाऊ सोनार यांनी जनतेसाठी आरोग्य तपासणीच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण केला आहे
📍 ठिकाण: शिवतीर्थ, जयकिसान सोसायटी, पाचोरा
🕘 वेळ: सकाळी ९ ते १२
📅 दिनांक: २० जुलै २०२५, रविवार

Post a Comment
0 Comments