Type Here to Get Search Results !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; रावेर पोलिसांची शिताफीने कारवाई, मुलगी सोलापूरमधून ताब्यात

 

मूख्य संपदाक:- सुनिता राजेंद्र महाडिक

बातमी व जाहिराती साठी संपर्क करा:-९२७३१६५२८३



रावेर तालुक्यातील के-हाळा येथून फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलुज येथून मुलीला सुखरूप ताब्यात घेण्यात आले असून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


या प्रकरणी पळवून नेणाऱ्या तरुणासही अटक करण्यात आली आहे. आरोपी राज्या उर्फ सोन्या बरेला (रा. केहऱ्हाळा बु., ता. रावेर) याला अकलुजमधून अटक करण्यात आली.


या संदर्भात रावेर पोलिस स्टेशन येथे रुमा पुन्या भिला (रा. चोपाली, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. के-हाळा, ता. रावेर) यांनी फिर्याद दिली होती की अज्ञात इसमाने त्यांच्या १२ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.


पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व नातेवाईकांची चौकशीच्या आधारे शोधमोहीम राबवत संशयिताचा मागोवा घेतला. अखेर अकलुज येथून मुलगी व आरोपी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.


या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.


ही कारवाई पो.हे.कॉ. विष्णू भिल, पो.कॉ. सचिन घुगे, पो.कॉ. नितीन सपकाळे, म.पो.कॉ. उज्वला पवार यांच्या पथकाने केली.


या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप (चोपडा) व अतिरिक्त विभागीय पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments