मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ८, राष्ट्रमाता मुकुंद नगर येथील ओपन स्पेसमध्ये भगवान महादेवाच्या पिंड पूजनाचा धार्मिक सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहात पार पडला.
या वेळी नव्याने पिंडी स्थापनेसाठी जागेची निर्मिती करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. पूजन व महाआरती जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या शुभहस्ते पार पडली.
सोहळ्यावेळी "हर हर महादेव" च्या गजरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होत भक्तिपूर्वक प्रार्थना केली.
कार्यक्रमाला गणेशाम महाजन, छोटू लाला चौधरी, घनश्याम भाऊ महाजन, छोटू सुरेश चौधरी, मुन्ना भाऊ चौधरी, भैय्या भाऊ चौधरी, आकाश भाऊ चौधरी, शांताराम भाऊ सोनोवने, आनंद महाजन, दिलीप परदेशी, मोनू सोनार यांसह अनेक मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पुढील सोमवारीही विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.


Post a Comment
0 Comments