Type Here to Get Search Results !

जनसेवक बंडूभाऊ सोनार यांच्या तत्परतेमुळे हरणीच्या काळवीटाचे प्राण वाचले!



मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 



📅 दिनांक: 29 जुलै 2025

📍 ठिकाण: पाचोरा – प्रभाग क्रमांक 8


पाचोरा शहरातील अरिहंत नगर व आदर्श नगर भागातील ओपन प्लेसमध्ये एका लहान हरणीच्या काळवीट आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांनी तात्काळ प्रतिसाद दिला.


बंडूभाऊंनी तातडीने वनविभागाचे चालक श्री. सचिन कुमावत यांच्याशी संपर्क साधत त्यांना घटनास्थळी पाचारण केले. स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने काळजीपूर्वक काळवीटाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले.


काळवीट थोडे जखमी असल्याने त्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील काळजीसाठी जळगाव येथील वनविभाग कार्यालयात त्याला रवाना करण्यात आले आहे.


✅ बंडूभाऊ सोनार यांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नामुळे एका निरपराध वन्यप्राण्याचे प्राण वाचले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments