Type Here to Get Search Results !

चाळीसगाव तालुक्यात ग्रामविकासाला नवी गती! 💪 आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिराती साठी संपर्क करा:- 9273165283


📈 राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत ४ ग्रामपंचायतींना मिळणार अत्याधुनिक नागरी सुविधा केंद्रे!


चाळीसगाव (ता. जळगाव) – ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपली जबाबदारी ओळखून आ. मंगेशदादा चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर त्याला यश आले आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, पिलखोड, वरखेडे आणि पिंपरखेड या ४ गावांतील ग्रामपंचायतींना प्रत्येकी ₹२५ लाख निधी मंजूर झाला असून, त्यातून नवीन ग्रामपंचायत कार्यालये व नागरी सुविधा केंद्रांचे बांधकाम होणार आहे.


🏢 हे केवळ इमारती नव्हे, तर गावाच्या विकासाचे प्रवेशद्वार असतील. ग्रामस्थांना शासकीय सेवा, माहिती व सुविधा मिळवण्यासाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.


🌟 आ. मंगेशदादा चव्हाण यांचे विशेष कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहचावा, या ध्येयाने अविरत कार्य केले आहे.


🙏 यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस दादा यांनीही ग्रामीण भागाच्या गरजा ओळखून तात्काळ निर्णय घेतला, हे खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवे वळण मिळत आहे.


भाजपचे सरकार हे खऱ्या अर्थाने विकासप्रिय, पारदर्शक आणि लोकाभिमुख असून, 'सबका साथ, सबका विकास' या ध्येयाशी कटिबद्ध आहे. गावागावात विकास पोहोचवण्याचे जे स्वप्न भाजपा सरकारने पाहिले होते, ते आता प्रत्यक्षात उतरते आहे.


🙏 पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या वतीने मनःपूर्वक आभार!


---

चाळीसगाव विधानसभा

मंगेश दादा म्हणजेच विकास

लोकसेवा

Post a Comment

0 Comments