Type Here to Get Search Results !

देशभक्तीचा जागर: भगिनी मंडळ शाळेत कारगिल विजय दिन साजरा





मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिराती साठी संपर्क करा:- 9273165283



भगिनी मंडळ अंबरनाथ संचालित बाळवाडी भगिनी मंडळ शाळा क्रमांक 1आणि श्रीमती सुहासिनी प्रभाकर अधिकारी माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 26व्या कारगिल विजय दिन सोहळयाचे आयोजन 

विध्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्राभक्ती जागृत व्हावी या उदात्त हेतूने भगिनी मंडळ संस्था गेली 25वर्ष कारगिल विजय दिन साजरा करत आहे. यावर्षी 26जुलै 2025 रोजी कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे सेवा निवृत्त 1.कॅप्टन श्री. दिपक दिनकर शिर्के सर (युनिट 11मराठा लाईफ इंन्फन्ट्री )

2.हवालदार श्री. दत्ताराम गंगाराम चव्हाण 

3.श्री. संदीप बाबुराव नाईक यांनी भूषविले. अंबरनाथ येथील हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारक येथे पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती मीना गुरुप्रसाद कानिटकर, खजिनदार श्रीमती संगीता सरदेसाई मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा सदानंद निपुर्ते 

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा निनाद समर्थ, सर्व शिक्षक वृंद, आणि विद्यार्थी उपस्थित होते. विध्यार्थ्यानी जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि स्मारकाला सलामी दिली.विध्यार्थ्यांना कॅप्टन श्री. दिपक दिनकर शिर्के सरांनी मार्गदर्शन पर भाषणात कारगिल विजय दिवसाचे महत्त्व, कारगिल वॉर मेमोरीयल, ऑपेरेशन विजय ची माहिती सांगितली. ये दिल मांगे मोर ही ओळ लक्षात ठेवून जिथे असाल, ज्या क्षेत्रात जाल तिथे प्रामाणिक पणे काम करून, सर्वाना आवश्यक ती मदत करून, समाजातील गरजवंताना मदत करून आपण देशसेवा करू शकतो असा संदेश दिला. आम्ही सैनिक समोर शत्रू आहे त्याच्याविषयीं आमच्या मनात राग आणि तिरस्कार आहे म्हणून लढत नाही तर आमच्या मागे आमचे ज्यांच्यावर प्रेम आहे असें आमचे आप्तेष्ट आहॆत त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही लढतो असा माणुसकीचा आणि विश्वबंधूतेचा संदेश दिला.

श्री. दत्ताराम गंगाराम चव्हाण यांनी ऑपरेशन विजय मध्ये प्रत्यक्ष सहभाग कसा घेतला याविषयी सांगितले त्यावेळची परिस्थिती आणि सैनिकानी दाखविलेले अदम्य साहस आणि अदभूत शौर्य याची माहिती सांगितली विध्यार्थी यांनी सैनिक आपल्या देशासाठी आपले बलिदान देतात त्यामुळे आपण सदैव त्यांचे ऋणी राहिले पाहिजे. प्रत्येकाने देशभिमान राखलाच पाहिजे. जिथे काही चुकीचे घडत आहे त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे असा संदेश दिला.

श्री. संदीप बाबुराव नाईक सर यांनी विध्यार्थ्यांना सैनिक म्हणजे स्वयम शिस्त, देशप्रेम, देशभिमान यांचा मिलाफ आणि स्व प्रेरणेने खडतर मार्ग निवडून देशबांधवांसाठी स्वतः च्या प्राणाची आहुती देणारा एक अवलिया असें त्यांनी सांगितले. ज्यांना सैनिक व्हायचे आहे त्यांचे कौतुक केलेच पण सैनिक न होता सुद्धा आपण पर्यावरण रक्षण, स्वच्छता मोहीम, ऐतिहासिक स्थळांचे रक्षण, आजारी-अपंग यांची सेवा या माध्यमातून करू शकतो असा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी पाहुण्यांच्या सहचारिणी सौं. चव्हाण मॅडम आणि सौं. नाईक मॅडम या उपस्थित होत्या. घरची आघाडी खंबीरपणे यांनी सांभाळून आपल्या पतीच्या देशसेवेमध्ये भक्कम साथ दिली. भगिनी मंडळाच्या वतीने यांसर्व पाहुण्यांना विध्यार्थी यांनी स्वतः बनविलेल्या नॅपकिनच्या 

पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.सहावी सातवीच्या विध्यार्थी यांनी समूह गीत गायनातून जवानांना

 मानवंदना दिली. इयत्ता 9वीच्या विध्यार्थी यांनी कारगिल च्या युद्धभूमीवर राहिल्या आठवणी या गीत गायनातून कारगिल मधील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा निनाद समर्थ यांनी केले, पाहुण्यांचा परिचय शिक्षिका श्रीमती अक्षया एकनाथ आवार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती वैशाली हेमंत मंडळ यांनी केले. पाहुण्यांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार शिक्षिका श्रीमती विजया अय्यर मॅडम यांनी केले. शिक्षक श्री. जगदाळे सर, श्री. खाकर सर, शिक्षिका सौं रोकडे,

 सौं.पाटील,कु. उभे कु. मयुरी तेरसे या सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. मोबाईल च्या युगात रिल स्टार हे रोल मॉडेल मानणाऱ्या आपल्या आजच्या पिढीला आपले खरे रोल मॉडेल म्हणजे हे आपले सैनिक आहेत हि जाणीव जागृती या कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून करण्यात आली.




Post a Comment

0 Comments