मुख्य संपादक: - सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील १० वर्षीय मुलगा दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बेपत्ता झाला. पालकांनी तक्रार देताना, अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून व फुस लावून मुलाला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला.
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार केली.
एक पथक पो.उपनि. प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली सेंधवा (मध्य प्रदेश) येथे रवाना झाले, तर दुसरे पथक पो.उपनि. कुणाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात तपासासाठी गेले. तपासादरम्यान गोपनीय सूत्रांकडून आरोपीची ओळख पटली — योगेश अनार शेमळ्या (वय २०, रा. भोरस बु., मुळगाव जामन्या, ता. सेंधवा, जि. बडवाणी, म.प्र.).
शशिकांत पाटील यांच्या पारदर्शक व अचूक मार्गदर्शनामुळे, पथकांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत चिंचगव्हाण फाटा येथून बालकासह ताब्यात घेतले. महिला पोलीसांनी पालकांच्या उपस्थितीत मुलाची विचारपूस केली असता, आरोपीने बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे गुन्ह्यात पोक्सो कायद्यांतर्गत कलमे वाढविण्यात आली असून, पुढील तपास पो.उपनि. प्रदीप शेवाळे करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शशिकांत पाटील हे त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनतेबद्दलच्या संवेदनशीलतेसाठी ओळखले जातात. समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय मिळवून देण्याचा त्यांचा ध्यासच आहे. या प्रकरणातील त्यांच्या तत्पर, काटेकोर व निष्पक्ष कारवाईमुळे केवळ बालकाचा जीव वाचला नाही, तर जनतेत पोलिसांबद्दलचा विश्वासही अधिक दृढ झाला आहे.

Post a Comment
0 Comments