Type Here to Get Search Results !

सौ सुनीता राजेंद्र महाडिक ताईंच्या पाठपुराव्याला यश – गटारीचे काम पूर्ण, मुख्याधिकारी (सीईओंचा) सन्मान








मुख्य संपादक: - सौ. सुनिता राजेंद्र महाडिक 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



चाळीसगाव, वार्ड क्रमांक 16 (जिंगरवाडी) –
अनेक वर्षांपासून गटारीची सोय आणि सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने जिंगरवाडीतील नागरिक त्रस्त होते. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट व्हायची. परंतु आजचा दिवस जिंगरवाडीकरांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे — गटारीचे काम पूर्णत्वास पोहोचले आहे.

या बदलामागे मोठी भूमिका आहे लाईव्ह नवं विचार न्यूजच्या धडाडीच्या व लढवय्या मुख्य संपादक सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांची. जिंगरवाडीतील जुने रहिवासी असलेल्या सुनीता ताईंनी नागरिकांची व्यथा थेट चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. सौरभ जोशी यांच्यापर्यंत पोहोचवली. केवळ तक्रार नोंदवून न थांबता, त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, व नगरपालिका अधिकाऱ्यांना पटवून सांगितले आणि “हे काम युद्धपातळीवर व्हायलाच हवे” असा ठाम आग्रह धरला.

मुख्याधिकारी श्री सौरभ जोशी यांनी तातडीने पावले उचलत, नगरपालिकेच्या इंजिनिअर कु. दिपाली गावित, एस. आय. विजय जाधव आणि आरोग्य विभागाचे साफसफाई मुकादम विजय जाधव यांना कामाची जबाबदारी सोपवली. यामुळे कामाला गती मिळाली.

या संपूर्ण प्रयत्नामागे सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे, चाळीसगावचे लाडके आमदार मंगेश दादा चव्हाण हे खरे योगदान आहे . दादांनी वारंवार नगरपालिकेला स्पष्टपणे सूचना दिल्या की “हे काम थांबता कामा नये”.

चार-पाच महिन्यांच्या नियोजन, पाठपुरावा आणि मेहनतीनंतर, अखेर गटारीचे काम पूर्ण झाले आहे. या यशानंतर, सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांनी स्वतः मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान केला आणि “हे यश हे नागरिकांच्या एकतेचे व प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाचे प्रतीक आहे” असे सांगितले.

हा केवळ विकासाचा टप्पा नाही, तर वर्षानुवर्षांच्या संघर्षाचा विजय आहे.

मनःपूर्वक आभार:

आमदार मंगेश दादा चव्हाण

मुख्याधिकारी सौरभ जोशी

इंजिनिअर दिपाली गावित

एस. आय. विजय जाधव

मुकादम विजय जाधव

आणि नागरिकांच्या हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या सौ. सुनीता राजेंद्र महाडिक



Post a Comment

0 Comments