Type Here to Get Search Results !

"माझ्या घरी रक्षाबंधनासाठी आलेले चाळीसगावचे लाडके आमदार – मंगेश दादा चव्हाण"

 













मुख्य संपादक:- सौ सुनीता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा: - 9273165283



चाळीसगाव तालुक्याचे लाडके आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या लाडक्या बहिणीच्या घरी म्हणजेच माझ्या घरी भेट देत औक्षण स्वीकारले


चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार व सर्वांचे लाडके व माझे मोठे भाऊ, श्री. मंगेश दादा चव्हाण यांनी आज त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त माझ्या म्हणजेच त्यांच्या बहिणीच्या घरी भेट दिली. या वेळी मी विधीपूर्वक औक्षण करत भावाबद्दलच्या प्रेमाची भावना व्यक्त केली.


मंगेश दादांचे कार्य गेल्या सहा ते सात वर्षांपासून सतत लोकांच्या सेवेत अखंड सुरू आहे. त्यांनी नुसते "काम करतो" म्हणून बोलून दाखवले नाही, तर प्रत्येक काम प्रत्यक्षात पूर्णत्वास नेले. गावागावातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सोयी-सुविधा, आरोग्य सेवा यामध्ये त्यांनी दिलेला वाटा लक्षणीय आहे. सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात.


त्यांच्या साधेपणामुळे आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ते जनतेच्या मनात खास स्थान मिळवू शकले आहेत. ते पदाचा वापर कधीच अहंकारासाठी करत नाहीत, उलट प्रत्येक व्यक्तीला आपला माणूस म्हणून जपतात. लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच त्यांची खरी ताकद आहे.


दादा माझ्या घरी आले असता परिसरातील नागरिकांनी आपापल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्या प्रत्येक समस्येचे गांभीर्याने ऐकून, त्या दूर करण्याचे आश्वासन दादांनी दिले. "दादा माझ्या घरी आले, हा क्षण माझ्यासाठी अतिशय आनंददायी, अभिमानास्पद आणि भावनिक होता," असे माझे म्हणणे आहे औक्षणानंतर झालेल्या मनमोकळ्या गप्पा  यामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments