मुख्य संपादक:- सौ सुनीता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:-9273165283
चाळीसगाव : जागतिक आदिवासी दिनानिमित्त चाळीसगाव सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. हजारो माता-भगिनी व नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा ऐतिहासिक ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मंगेश दादांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रम लक्षणीय ठरले. त्यांच्या पुढाकारामुळे संपूर्ण शहरात उत्साहाची लाट उसळली होती.
मंगेश दादा फक्त बोलून दाखवणारे नाहीत तर करून दाखवणारे, काम करणारे आमदार म्हणून ओळखले जातात. साधेपणा, जमिनीशी नाळ जोडलेला स्वभाव आणि स्वतः लोकांमध्ये राहून त्यांची काळजी घेणं ही त्यांची खासियत आहे. त्यामुळेच समाजात त्यांच्याबद्दल अपार आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.
मिरवणुकीदरम्यान एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे तसेच विविध आदिवासी भिल्ल समाज संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. प्रमुख पाहुण्यांनी आदिवासी दिन हा अस्तित्व, अस्मिता आणि अभिमानाचा उत्सव असल्याचे सांगितले. एकलव्य, तंट्या भिल्ल, ख्वाजाजी नाईक, राघोजी भांगरे यांसारख्या क्रांतिवीरांचे स्मरण करून त्यांचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
भिल्ल समाजाच्या विकासासाठी 18 गावांमध्ये 3 कोटींच्या खर्चाने "एकलव्य सभागृह" उभारणी सुरू असून, भगवान एकलव्याचे भव्य स्मारक (2.30 कोटी रुपये) व धरणगाव येथे क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक स्मारक (20 कोटी रुपये) बांधण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जात प्रमाणपत्र वितरण मोहिमेतून 550 हून अधिक युवकांना लाभ मिळाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमानंतर नागरिकांनी मंगेश दादांच्या कार्यतत्परतेचे आणि समाजातील एकजूट वाढविण्याच्या त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. “पद असो वा नसो, आदिवासी भिल्ल समाजाच्या न्याय व विकासासाठी मी सदैव उपलब्ध राहीन,” असे मंगेश दादांनी ठामपणे सांगितले.
समारोप ‘जय एकलव्य, जय तंट्यातात्या भिल्ल, जय शिवराय, जय भारत’ या घोषणांनी झाला.
#चाळीसगाव #मंगेशदादा #आदिवासीदिन #AdivasiPrideDay #AdivasiCulture

Post a Comment
0 Comments