मुख्य संपादक:- सौ सुनीता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा: - 9273165283
चाळीसगाव –
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र दिवस यंदा एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. लाईव्ह नव विचार न्यूजच्या मुख्य संपादक सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांनी आपल्या विभागात एक नवीन परंपरा रुजवली.
नेहमीप्रमाणे रात्री बारा वाजता मोठी "चोर हंडी" न फोडता, त्यांनी बाळगोपाळांसाठी खास "चिमुकल्यांची हंडी" आयोजित केली. विशेष म्हणजे ही हंडी उंचावर न बांधता थोडी खाली बांधण्यात आली. चिमुकल्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना हंडी फोडण्याचा अनुभव देण्यात आला.
बाहेर जोरदार पाऊस सुरू असतानाही सौ. सुनीता महाडिक यांनी कुठेही अडथळा न आणता संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
या उपक्रमामुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि सर्व विभागवासीयांनी याला भरभरून दाद दिली. यावेळी सौ. सुनीता महाडिक यांनी विभागातील लोकांसोबत मिळून सर्व तयारी केली तसेच चिमुकल्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजनही केले.
सौ. सुनीता महाडिक या केवळ पत्रकार नसून समाजसेविका म्हणूनही नेहमीच पुढाकार घेतात. समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची धडपड त्यांच्या कामातून दिसून येते. या जन्माष्टमीच्या उपक्रमातूनही त्यांची समाजाभिमुख विचारसरणी स्पष्टपणे जाणवली.
रात्री बारा वाजता सौ. सुनीता महाडिक आणि श्री. राजेंद्र खंडू महाडिक यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटाने जन्माष्टमी साजरी झाली. बाळकृष्णाच्या पाळण्यात झुलवून झाल्यानंतर, हंडी फोडण्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला.
🌺🪷 या अनोख्या उपक्रमामुळे विभागात सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांचे समाजसेवक आणि आगळावेगळा विचार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भरभरून कौतुक होत आहे. 🌺🪷



Post a Comment
0 Comments